"सर्व परिचित असे जांभुळ"
सतत हिरव्या पानांनी बहरलेल्या या वृक्षाला संस्कृत मध्ये जंबु असे म्हणतात. असतो.
"जम्ब: संग्राहिणी रुक्षा कफ पित्त अस्र दाह जित ||
भा. प्र.
"जांबवं वातजननानाम |"
च.सू.२५
जांभुळ रसाने कषाय (तुरट), मधुर (गोड), आम्ल (आंबट) असते.
पोटात गेल्या नंतर ते कटु किंवा तिखट विपाकी बनते.
जांभुळ हे गुणाने शीत वीर्य किंवा थंड आहे.
* जांभळाचे बीज तुरट आणि शीत असल्याने वारंवार आवयुक्त जुलाब होत असल्यास चूर्ण घ्यावे.
* अम्ल पित्त मध्ये उलटी होत असल्यास जांभळा च्या सालीचा ताजा रस उपयुक्त.
*फळांचा अधिक वापर मल प्रवृत्ती कडकं होण्यास कारण त्यामुळे अती नको! कोवळी पाने उलटी थांबवणार !
* पानांचा रस वैद्य सल्ल्याने शेळीच्या दुधासह लहान मुलांच्या जुलाब मध्ये उपयुक्त.
* दातदुखी, घसा दुखणे, मुख पाक किंवा तोंड आले असता जांभळा च्या सालीचा उपयोग होतो.
* फळ,बी चूर्ण दिल्याने यकृतातील साखर पचनास मदत तसेच रक्त, मुत्रातील शर्करा नियंत्रित,मुत्र मात्रा/वारंवारता कमी, मधुमेहा मध्ये क्लेद वृद्धी आणि मेद दृष्टी झालेली असते, अशा वेळेस अत्यंत उपयुक्त असतात.
* मुळ व्याधी मध्ये रक्त जात असल्यास त्याचे स्तंभन करण्यासाठी जांभुळ बीचे चूर्ण घेतल्याने तात्काळ आराम मिळतो.
* मासिक पाळी मध्ये खूप अंगावरून जात असल्यास जांभुळ बीचे चूर्ण / पानांचे चूर्ण तांदुळाचे धूवना सोबत घेतल्याने आराम मिळतो.
विशेष सुचना - वरील सर्व औषधी प्रयोग आपल्या जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेऊन करावे.
जिलेबी / Jalebi is most known name for the classical sweet – Kundalini. The name Kundalini is given due to ‘Kundala’ circular shape.
"नूतनं घटमानीय तस्मात्ततः कुशलो जनः।
प्रस्थार्ध परिमाणेन दध्ना$म्लेन प्रलेपयेत्।।
द्विप्रस्थां समितां तत्र दध्यम्ल प्रस्थसम्मितम्।
घ्रुतमर्धशरावं च घोलयित्वा घटे क्षिपेत् ।।
आतपे स्थापयेत् तावद् यावद्दाति तदम्लताम् ।
ततः तत्प्रक्षिपेत् पात्रे सच्छिद्रे भाजनेतु तत् ।।
परिभ्राम्य परिभ्राम्य सुसन्तप्ते घ्रुते क्षिपेत् ।
तां सुपक्वां घ्रुतान्नीत्वा सितापाके तनुद्रवे ।।
कर्पुरादि सुगन्धे च स्नापयित्वा उध्दरेत्ततः ।
एषा कुण्डलिनी नाम्ना पुष्टिकान्तिबलप्रदा ।।
धातुवृध्दिकरी वृष्या रुच्या चेन्द्रियतर्पणी ।।"
भावप्रकाश निघण्टु / १३२-१४२
Bhavaprakasha nighantu/Kritanna varga/132 – 142
Properties:
•Heavy (गुरु),
•Coolant (शीत),
•Sweet (मधुर),
•Unctuous (स्निग्ध),
•Balances Vaat (वात) & Pitta(पित्त) Dosha
Uses:
*Very Nutritive (बृहण),
*Energizer (बल्य)
*Appetizer/Tasty (रुच्य)
*Nourishes sense organs (इंद्रिय तर्पण)
*Complexion enhancer (कांतीवर्धक): we can advised to the pregnant, especially in second and third trimester, also helps to nourish the senses.
*Aphrodisiac (वृष्य) quality, etc.
*Jalebi balances Vata and Pitta Dosha. Especially in migraine headache, gastritis, hyperacidity.
पावसाळा सुरु झाला की सगळी कडे हिरवळ बघायला मिळते अनेक झाडे, लता नव्याने पावसाळ्यात नव्याने येतात.. ह्या पैकी काही वनस्पती ह्या फक्त पावसाळ्यात येतात व औषधी गुणधर्माचा आणि रोजचा आहार मध्ये हि समाविष्ट होतात ..ह्या पैकीच एक वनस्पती जी पावसाळा सुरु झाला की बाजारात सगळी कडेच सहज बघायला मिळते ती म्हणजे टाकळा ( चक्रमर्द).
१. टाकळ्याच्या पानाची भाजी खाली जाते ती त्वचा विकार जसे खरूज,नायटा ,या वर उत्तम आहे.
२. ती उत्तम कृमिघ्न आहे म्हणजेच शरीरातले आणि रक्तातले कृमी वर कार्य होते.
३. कृमी मुले येणारी अंगावर पुरळ आणि खाज ह्याने कमी होतात.
४. पान हे कण्डूघ्न , लेखन ,विषघ्न कार्य चांगले करते .
५. आंबट द्रव्य जसे दही किहवा लिंबू किंवा करंज तेलामध्ये वाटून त्याचा बियांचा लेप खरूज ,गजकर्ण ,इत्यादी विकारांवर उपयोगी आहे .
६. टाकळ्याच्या बियांचा कॉफी प्रमाणे पेय करून देतात त्याने रक्त शुद्धी होते व बरेच त्वचा रोग बरे होतात.
७. टाकळ्याचे तैल बनवून ते खाजेवर लावल्यास ती बरे होते.
८. keloid नावाच्या त्वचा विकारावर त्याची बी त्रिधारी निवडुंगाच्या रसात वाटून गोमूत्रात खालून लावतात.
९. टाकला हा मेद कमी करणारा आहे .
१०. टाकला हा इतर व्याधी जसे कुष्ठ ,अर्श ,गुल्म ,कास ,श्वास ह्या वर हि उत्तम कार्य करतो.
११. अशक्तपणाने कंबर दुखत असल्यास याचे लाडू करून खावेत.
१२. टाकळ्याच्या फळांचे चूर्ण तुपात कालवून घेतल्यास शीतपित्त बरे होते.